ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी
भेटीत तृष्टता मोठी
त्या कातरवेळा थरथरती कधि अधरी
त्या तिन्हीसांजांच्या आठवणी त्या प्रहरी
कितिदा आलो, गेलो, रमलो
रुसण्यावाचुनि परस्परांच्या कधी न घडल्या गोष्टी
कधि तिने मनोरम रुसणे
रुसण्यात उगीच ते हसणे
म्हणून ते मनोहर रुसणे
हसणे, रुसणे, रुसणे, हसणे
हसण्यावरती रुसण्यासाठी, जन्मजन्मिच्या गाठी
कधि जवळ् सुखाने बसलो
दुःखात सुखाला हसलो
कधि गहिवरलो, कधि धुसफुसलो
सागरतीरी आठवणींनी वाळूत मारल्या रेघा,
जन्मासाठी जन्म जन्मलो, जन्मात जमली ना गट्टी
Thursday, January 29, 2009
Runanubandhachya Jithun Padlya Gathi (ऋणानुबंधांच्या जिथून पडल्या गाठी)
Subscribe to:
Post Comments (Atom)
really meanigful & nice song..!
ReplyDeleteNice song
ReplyDeleteअख्ख आयुष्य लपलय या गाण्यात...ज्याला समजले त्याला समजले..लहानपणा पासुन या ओळींंनी आकर्षित केले होते पण आज जेंव्हा "भाई,व्यक्ती की वल्ली" बघीतला तेंव्हा आयुष्याचे खरे मर्म समजले...पु लं देशपांडे ना शतशः प्रणाम...🙏
ReplyDelete